मुली प्रेग्नेंट कसे होतात?HealthPlanet

Posted on Wed 12th Oct 2022 : 10:30

हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. त्यांचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल हवं असतं किंवा ते त्या दृष्टीनं प्लॅनिंग करतात, तेव्हा काही प्रश्न त्यांच्या मनात असतात, की मूल व्हावं याकरिता लैंगिक संबंध ठेवण्याची नेमकी वेळ कोणती आणि या संबंधानंतर महिलांच्या शरीरात कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू होते? ही सर्व प्रक्रिया कशी असते, ते जाणून घेऊ या.

काही महिलांना एकदाच लैंगिक संबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा होते, तर काही महिलांना अनेकदा लैंगिक संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यानं महिलांवर एक प्रकारचा ताण आल्याचं दिसून येतं. आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या मते, एका विशिष्ट वेळी लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते, स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशननंतरच (Ovulation) गर्भधारणा होऊ शकते. महिलांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती आणि प्रसारण होण्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. स्त्रियांच्या शरीरातलं बीज (Eggs) आणि पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचा (Sperm) संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. स्त्रियांच्या शरीरात बीज प्रसारित होताना त्यांच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये शुक्राणू आले, तरच बीज आणि शुक्राणूंचा संयोग होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. परंतु, अनेक महिलांना ओव्ह्युलेशनचा निश्चित कालावधी माहिती नसतो.ओव्ह्युलेशननंतर संयोगासाठी उपलब्ध असलेला कालावधी अत्यंत कमी असतो. त्यामुळे गर्भधारणा व्हावी, असं वाटत असेल तर ओव्ह्युलेशनचा कालावधी जवळ येताच लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात करावी, असं तज्ज्ञ सांगतात. ओव्ह्युलेशननंतर संयोगासाठी (Conceive) सुमारे 12 तासांचा कालावधी लागू शकतो. ओव्ह्युलेशननंतर एका बीजाचं आयुष्यमान 24 तासांचं असतं. याचा अर्थ असा, की ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या आत स्त्री-बीज आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही, तर गर्भधारणेची शक्यता कमी होते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info